आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत प्रकल्पातील भंगार वाद:डॉ. पलोड यांची तडकाफडकी बदली; पुन्हा कुटे यांच्याकडेच पदभार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे 350 काेटी खर्च करून पाच वर्षासाठी दिल्या गेलेल्या घंटागाडी ठेक्याद्यारे संकलीत हाेणाऱ्या कचऱ्यातील साेन्याचा अर्थातच भंगार संकलनासाठी विशिष्ठ ठेकेदाराला काम मिळत नसल्याच्या कथित मुद्यावरून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ आवेष पलाेड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

या प्रकरणामागे कथितरित्या शिवसेनेचे काही नेत्यांचे संबंध असल्याची बाब चर्चचा विषय ठरली आहे. पलाेड यांच्या जागी आता, यापुर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालकपद भुषवलेल्या डाॅ कल्पना कुटे यांच्याकडे पदभार साेपवला आहे.

महापालिका आयुक्त डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रजेवर जाण्यापुर्वी अत्यंत गुप्तपणे हे आदेश काढल्याचे सांगितले जाते. स्वत: या बदलीसाठी ते नाखुष असल्याचे मानले जाते. मात्र गेल्या काही महिन्यापासून खत प्रकल्पावर घंटागाडीमार्फत जाणाऱ्या भंगाराचे काम काेणाला मिळावे यावरून सुरू असलेली रस्सीखेच व पालिकेने अधिकृतपणे या वादात न पडण्याची घेतलेली भुमिका यामुळे डाॅ पलाेड यांना हटवले गेल्याचे मानले जात आहे. पलाेड यांनी स्वच्छ शहर स्पर्धत नाशिकला पुढे आणण्यासाठी अत्यंत तळापर्यंत जावून प्रयत्न केले हाेते. तसेच घंटागाडी केरकचरा संकलनापासून तर घनकचरा व्यवस्थापन विभागाला शिस्तही लावण्याची धडपड चालवली असतानाच त्यांना हटवून पुन्हा कुटे यांना चाल दिली गेली. दरम्यान, या बदलीमध्ये भाजपाच्या एका आमदाराची माेठी भुमिका असल्याची चर्चा आहे.

सारेच संशयास्पद; सुट्टीच्या दिवशी काढले आदेश
पलाेड यांच्या बदलीसाठी आयुक्तांनी जाता-जाता सही केली व त्यावर भाजप किंवा अन्य पक्षाकडून आक्षेप येवू नये यासाठी हे आदेश शनिवारी अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकले गेल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला.

सेवाज्येष्ठता यादीनुसार कधी मिळणार संधी ?

डाॅ पलाेड काय आणि आता पुर्ननियुक्ती केलेल्या कल्पना कुटे या दाेघांचाही तसा घनकचरा व्यवस्थापन विभागाशी थेट संबंध नाही. एक अस्थीराेग तज्ञ तर दुसरे स्त्रीराेग तज्ञ असल्यामुळे त्यांना खरे तर पालिकेच्या दवाखान्यात नियुक्ती देणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधीक्षक असलेले डाॅ बापुसाहेब नागरगाेजे यांचे पदच वैद्यकीय व आराेग्यधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे दाेन्ही जबाबदारी देणे क्रमप्राप्त हाेते मात्र नियमांना धरून चालताे असे सतत सांगणाऱ्या डाॅ पुलकुंडवार यांनी येथे मात्र का नियम बदलला असाही प्रश्न केला जात आहे. तसेच सेवाज्येष्ठता यादीनुसार पात्र अधिकाऱ्याकडे जबाबदारी का दिली जात नाही असाही प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...