आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगा:मशिदींमध्ये डेसिबलच्या मर्यादेचा; मनसेच्या 7 जणांना शहर प्रवेशबंदीचा

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरू खतीब-ए-शहर हाफिज हिसामोद्दीन साहब खतीब यांच्या सूचनेनंतर मशिदीवरील भोग्यांचा आवाज कमी झाल्याचे बुधवारी (दि. ४) दिसून आले. तर दुसरीकडे आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या मनसेच्या ७ जणांना सरकारवाडा पोलिसांनी विविध ठिकाणांहून अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची शहर प्रवेशबंदी केली. पहाटे मात्र दुधबाजारात मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी धावाधाव, घोषणाबाजी झाली.

भद्रकाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर नाशिकरोडमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. सातपूरमध्ये मनसेचे नेते सलिम शेख पोलिसांच्या नजरकैदेत होते. तेथेही मनसैनिकांवर कारवाई झाली. तर भोंग्याच्या परवानगीचे ३९ अर्ज पोलिसांनी बाद केले.

खतीब-ए-शहर यांनी मशीद ट्रस्टींना निवासी भागात ५५ डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात ६० ते ६५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाला परवानगी नाही. ही मर्यादा लक्षात घेऊन कोर्टाच्या नियमानुसार सूचना दिल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...