आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमाल मातीमोल, गावच विक्रीला काढले:कर्जबाजारीपणामुळे माळवाडीत निर्णय

देवळा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशात शेती व्यवसाय मातीमोल भावामुळे मरणासन्न झाला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. शासनही याची दखल घेत नसल्याने तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी व नागरिकांनी निषेध म्हणून चक्क संपूर्ण गावच विकण्याचा निर्णय घेतला आहे. आता तरी शासन जागे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आलेल्या संदेशानुसार माळवाडी गावात सुमारे ५३४ हेक्टरवर शेतकरी शेती व्यवसाय करतात. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि कांद्याचे पीक घेतले जात आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला दाम मिळत नाही. माळवाडी आणि फुलेमाळवाडी गावासह देवळा तालुक्यातील कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. यात शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायातून उपलब्ध होत नाही. दैनंदिन गरजा व खासगी तसेच सरकारी बँकांची कर्ज चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय नसल्याने माळवाडी येथील सर्व शेतकऱ्यांनी सरकारचे शेतीचे धोरण पूर्णपणे चुकीचे आहे. कांद्यासह कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला आहे. त्यातूनच फुले माळवाडी येथील शेतकऱ्यांनी गाव विकणे आहे असा टोकाचा निर्णय घेतलेला असावा. सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नाशिक

एकत्रित येऊन संपूर्ण गाव विकण्याचे ठरवले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या गरजा भावण्यासाठी व त्यांना कर्जमुक्त करण्याइतके शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकारने विकत घेण्याची मागणी शेतकरी प्रवीण बागुल, अमोल बागुल, राकेश सोनवणे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

जमिनी घेऊन पैसे द्या
^ कुठल्याही शेती मालाला भाव नाही. आत्महत्या करण्यापेक्षा उदरनिर्वाहासाठी जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ गाव विकण्याचा एकमताने ठराव करीत आहोत. यात केंद्र, राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हला पैसे उपलब्ध करून द्यावेत.
प्रवीण बागूल, शेतकरी, माळवाडी

बातम्या आणखी आहेत...