आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव:दहेज घेणाऱ्यांचा निकाह न लावण्याचा निर्णय, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डाचा पुढाकार

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांचे आयुष्य उद‌्ध्वस्त करणारी दहेज (हुंडा) प्रथा खंडित करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डाने पुढाकार घेतला आहे. जबरदस्ती किंवा हट्टाने दहेज घेणाऱ्याचा निकाह न लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. कमी खर्चात साध्या पद्धतीने निकाह कसे करावेत याविषयी जनजागृतीसाठी ११ ते २० मार्चदरम्यान राज्यभर माेहीम राबवली जाणार आहे.

अहमदाबादच्या आयेशा खान आत्महत्या प्रकरणामुळे दहेज प्रथा पुन्हा चर्चेत आली. रविवारी (दि.७) राज्यभरातील ३५ जिल्ह्यांच्या ४०० मुस्लिम मुफ्ती, काझी, माैलाना आदी धर्मगुरूंच्या ऑनलाइन बैठकीत दहेजवर दीर्घ चर्चा झाली. मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डाचे सचिव माैलाना उमरैन महेफूज रहेमानी म्हणाले, दहेज पद्धत समाजाला घातक आहे. इस्लामने अगदी साध्या व साेप्या पद्धतीने निकाह करण्यास मान्यता दिली आहे. दहेजविराेधात प्रबाेधन करणे काळाची गरज आहे. बैठकीचे अध्यक्ष माैलाना अब्दुल हमीद अझहरी यांनी काेराेना संकट लक्षात घेऊन प्रत्येक जबाबदार व्यक्तीने आपल्या शहरात दहेजविराेधात जनजागृती करावी, असे आवाहन केले. चर्चेत सहभागी अनेक धर्मगुरू व बाेर्ड सदस्यांनी सूचना मांडून त्यावर अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
- निकाह साेहळे साध्या पद्धतीने साजरे करण्यासाठी माेहीम राबवणे.
- तीन आठवडे प्रत्येक शुक्रवारी मशिदींमधून दहेजविराेधात प्रबाेधन.
*बळजबरी दहेज घेणाऱ्यांच्या निकाहात सहभागी न हाेता त्यांचा निकाह कुणीही लावू नये.
- बाेर्ड सदस्यांनी तीन दिवस आपल्या भागातील जबाबदार व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधून मार्गदर्शन करावे.
- उपवर वधू व वरांशी संवाद साधून त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणे.

बातम्या आणखी आहेत...