आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष कायदा:महापालिका निवडणुकीच्या भवितव्याचा आज फैसला

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने विधीमंडळात विशेष कायदा पारीत करून राज्यातील १८ महापालिकांकरीता तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना रद्द करून नव्याने प्रक्रिया करण्याचे अधिकार स्वत:कडे घेतले आहते. त्याविरोधात दाखल याचिकेवर ४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पावसाळा पूर्व निवडणुका घेण्याच्यादृष्टीने गेल्याच सुनावणीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्यामुळे किंबहुना निवडणूकक आयोगानेही पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाही असे स्पष्ट केल्यामुळे नेमके काय होते हे बघणे महत्वाचे आहे. दुसरीकडे, नाशकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसाधारणपणे सत्तेच्याविरोधात येणारा काैल पाहता निवडणुका लांबणीवर पडतील अशा भ्रमात राहू नका असे सांगितल्यामुळे उत्सुकता शिगेला पाेहचली आहे.

पावसाळ्यास केवळ एकच महिना शिल्लक आहे. तोपर्यंत निवडणुक घेणे अशक्य असून त्याचे कारण म्हणजे, अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे, प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करून त्यावर हरकती व सुचना घेणे, मतदार यादी अंतिम करणे व निवडणुक प्रक्रिया राबवण्यासाठी लागणारा किमान ३० ते ३५ दिवसाचा कालावधी लक्षात घेत तोपर्यंत जुलै उजाडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...