आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान पर्व सुरू:चंद्रदर्शन घडल्यानंतर चॉँद समितीच्या बैठकीत उपवासाबाबत निर्णय; उपवास आजपासून

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधवांचा धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना असलेल्या रमजान पर्वला शनिवारी (दि. २) सूर्यास्तानंतर प्रारंभ झाला. मुस्लिम बांधव आज (दि. ३) पहाटेपासून रमजानचा पहिला निर्जळी उपवास करणार असल्याचे शाही मशिदीमध्ये झालेल्या चॉँद समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. इस्लामी कालगणनेनुसार येणारा नववा महिना हा रमजानचा महिना असतो. या महिन्यात मुस्लिम बांधवांच्या धार्मिक उपासनेला विशेष महत्त्व असते. पवित्र पर्वात बांधव सूर्योदय ते सूर्यास्त निर्जळ उपवास करतात. शनिवारी पर्वाला प्रारंभ झाला. रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या पर्वात पहाटेची सहरी, सायंकाळचा इफ्तार आणि तरावीहची नमाज याबाबत वेळ निश्चित केली आहे. रमजाननिमित्त खजूर व इतर फळांची आ‌वक शहरात झाल्याने इफ्तारसाठी पदार्थ उपलब्ध झाले आ हेत. इफ्तारकरिता भद्रकाली, वडाळागाव, भारतनगर, नागजी परिसर, सिडको व सातपूर भागात सहेरी व इफ्तारसाठी खजूर, फळे, दूध व इतर पदार्थ खरेदीसाठी दुकाने लागली आ हेत. शहरातील सर्व मशिदींमध्ये बैठकीची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. रमजान पर्वात मशिदींमध्ये नमाजपठणासाठी दिवसभर गर्दी असते. तसेच रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये ‘तरावीह’ची विशेष सामुहिक नमाज अदा केली. जाते.

दुधाचे दर ८० रुपये लिटर
पवित्र रमजानुल मुबारक महिन्याची सुरुवात होणार हे ठरलेले होते. म्हणून येथील बाजारपेठेत दुपारनंतर रोजा ठेवण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे रोज ६० ते ६५ रुपये प्रति लिटरप्रमाणे विक्री हाेणाऱ्या दुधाचे भाव थेट ८० ते ८५ रुपये लिटर करण्यात आले होते. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. शिरमल नान, खजूर तसेच फळे खरेदीसाठी दुकानांवर गर्दी झाली होती.

निर्बंधविरहित साजरा होणार रमजान
दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाचे संकट असल्याने रमजान पर्व अतिशय साध्या पद्धतीने घरच्या घरीच साजरे करण्यात आले. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंध शिथिल केले आ हेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदी करणे, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध नसल्याने निर्बंधविरहित रमजानपर्व साजरे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...