आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोवासीयांच्या आंदोलनाला यश:नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याचा निर्णय

सिडको5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याचा शासनाने बुधवारी (दि. ९) निर्णय घेतला असून सिडकोतील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या लढ्याला यश आले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी सिडकाे कार्यालय सुरू ठेवतानाच नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

राज्य शासनाने नव्याने सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून नाशिकमधील सिडकाे प्रशासकीय कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सप्ताहात अचानक सिडको कार्यालय बंद करण्यात येत असल्याचा गृहनिर्माण विभागाकडून आदेश काढण्यात आले होते.

या निर्णयामुळे सिडकाे कार्यालय बंद झाल्यास सिडकाेतील सुमारे ४० हजार घरे व भूखंडधारकांना कुठल्याही नकामासाठी आैरंगाबाद कार्यालयाकडे जावे लागणार हाेते. या निर्णयाला विराेध करण्यासाठी सिडको बचाव समिती स्थापली हाेती. शासनाने हा निर्णय न बदल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हे कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवीन परिपत्रकाचा आशय
नगरविकास विभागाच्या अवर सचिव समाधान खटकळे यंनी सिडकाेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले की, सिडकोचे नाशिक येथील कार्यालयातील आवश्यक असणारा कमीत कमी लिपीक वर्गीय कर्मचारी वर्ग नाशिक कार्यालयात कायम ठेवावा. अन्य अधिकारी कर्मचारी विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्यात यावी. यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास द्यावी, असे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...