आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळांची सजावट.:अक्षय्य तृतीयेनिमित्त मंदिरांमध्ये आंब्यांची आरास; सोमवार पेठेतील संत गजानन महाराज मंदिरात केलेली फळांची सजावट.

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधत यंदाही रविवार कारंजा परिसरातील श्री सिद्धिविनायक गणपती अर्थात चांदीच्या गणपती मंदिरातही १५१ किलो आंब्यांच्या महानैवैद्य बाप्पांना दाखविण्यात आला. सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून या आंब्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

नवश्या गणपती मंदिरातही ३०२ आंब्यांची आरास करण्यात आली होती. नवश्या गणपती मंदिरात पहिल्यांदाच अशी सजावट करण्यात आली होती. हा सोहळा डोळ्यास साठविण्यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत मंदिरात गर्दी कायम होती. तसेच अनंत हुतात्मा कान्हेरे मैदानालगत असलेल्या दत्तमंदिरातही आंब्यांची आरास करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...