आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमापूजन:संतशिरोमणी नामदेव महाराज मंदिरात दीपाेत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पंचमंडळ अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाच्या वतीने संत नामदेव महाराजांची ७५२ वी जयंती साजरी करण्यात आली. मेनरोड येथे माजी महापौर विनायक पांडे, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, ऋतुराज पांडे यांच्या वतीने प्रतिमापूजन व महाआरती करण्यात आली. अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र करमसे यांनी केले. प्रा. के. आर. शिंपी, अतुल मानकर, प्रवीण पवार, रवींद्र पवार, रमेश चांडोले, योगेश वारे, सौरभ बागूल, सचिन चुंबळे, राकेश जगताप, गणपत बागलाणे, वासुदेव काळे आदींसह शिंपी समाजबांधव उपस्थित होते.

शहर नामदेव शिंपी पंचमंडळाच्या वतीने संत नामदेव विठ्ठल मंदिर काझीपुरा येथे सकाळी सात वाजता संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक व काकड आरती करून दीपोत्सव साजरा झाला. गायिका प्रांजली नेवासकर, मिलिंद धटिंगण आणि सहकारी यांनी भक्तिगीताचा कार्यक्रम सादर केला. रात्री महाआरती आणि महाप्रसाद, त्यानंतर रात्री राजेंद्र चांडोले व सहकारी यांनी हरिजागर केला. उपस्थितांचे स्वागत समस्त विश्वस्त मंडळ, संत नामदेव शिंपी पंचमंडळाचे अध्यक्ष अरुण नेवासकर यांनी केले. राजेंद्र करमासे यांनी पंचमंडळाचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...