आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक:लग्न झालेल्या प्रेयसीचे अश्लील फोटो टाकून बदनामी; गुन्हा दाखल झाल्याने प्रियकराला अटक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न झालेल्या प्रियेसीच्या पतीला प्रियकराने अश्लील फोटो दाखवल्याने विवाहितेचा संसार मोडला. याप्रकरणी संशयिता प्रियकराच्या विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायदा अधिनिय अंतर्गत सोमवार दि. 6 रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सहा वर्षापासून नात्यातील एका विवाहित व्यक्ती सोबत प्रेमसंबध होते. संशयिताने लग्नाचे अमिष देत वारंवार बलात्कार केला. याप्रकाराचे मोबाईलमध्ये न कळत चित्रिकरण केले. दोन महिन्यापूर्वी पुण्यात एका तरुणासोबत लग्न झाले. संशयिताने या विवाहितेच्या पती आणि सासऱ्यांना अश्लिल फोटो, व्हिडिओ पाठवले. याचा पतीने जाब विचारत घरातून हकलून दिले. पिडितेने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत संशयित विवाहित पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरिक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

महिलेचा संसार मोडण्याच्या वाटेवर

युवतीने दुसरीकडे लग्न केल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या पतीला आणि सासऱ्याला अश्लिल फोटो पाठवल्याने पिडित विवाहितेच्या सासरी वाद सुरु झाले. पतीने घरातून हकलून दिल्याने महिलेने पतीच्या विरोधात महिला विभागात तक्रार दिली आहे. पती नांदवण्यास तयार नसल्याने या विवाहितेचा संसार मोडण्याच्या वाटेवर आहे.

बातम्या आणखी आहेत...