आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थम वर्ष:पदवी प्रथम वर्षाचे ऑनलाइन प्रवेश, २३ जूनपर्यंत अर्ज ; विहित मुदतीत प्रवेश घेण्याचे आवाहन

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालय वगळून इतर सर्व महाविद्यालयांत प्रथम वर्ष पदवी वर्गांचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांना https://mvperp.org या संकेतस्थळाला भेट देऊन १३ ते २३ जूनपर्यंत प्रवेश अर्ज करावा लागेल. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. प्रथम गुणवत्ता यादी दि. २५ जून रोजी जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २८ जूनपर्यंत विहित मुदतीत प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज भरताना मूळ गुणपत्रिका (मूळ गुणपत्रिका मिळालेली नसेल तर ऑनलाइन मार्क स्टेटमेंटची प्रिंट जोडावी), शाळा सोडल्याचा मूळ दाखला, गॅप सर्टिफिकेट, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, रहिवासी दाखला, जातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेअर इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. (स्कॅन मूळ कागदपत्रांवरूनच करावीत). प्रवेश अर्ज भरल्यानंतर तो अर्ज प्रवेश कमिटीकडून प्रमाणित झाल्यानंतर संकेतस्थळाला भेट देऊन पेमेंट गेट वे हा पर्याय निवडून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन ऑफलाइन प्रवेश फी भरावी.

बातम्या आणखी आहेत...