आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षाणिक सत्र लांबणार:पदवीचे निकाल रखडले ; शिक्षणशास्त्रच्या 35 हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर यंदा परिणाम

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनेक विद्यापीठांचे पदवी परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर होऊ न शकल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची (बी.ए.) प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे राज्यातील अध्यापक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने राज्यातील ३५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होणार असल्याने यंदाचे शैक्षणिक सत्र देखील लांबणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीसाठी सुरुवातीला १२ ऑक्टोबरपर्यंत पसंतीक्रम नोंदविण्यासाठी विहित मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीनंतर ३० ऑक्टोबर आणि आता पुन्हा १० नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या वारंवार बदलणाऱ्या वेळापत्रकाचा परिणाम पुढील सर्व प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे.बी.एड.साठी यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३५ हजार जागांसाठी तब्बल ५६ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र बी.एड.चे वेळापत्रकात तीन वेळा बदल करण्यात आले. सीईटी सेलने प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु त्या वेळापत्रकानुसार कोणतीच प्रक्रिया होऊ शकली नाही. महाविद्यालयांनी नोंदणी केली, परंतु नाहरकत प्रमाणपत्र नाही. यामुळे प्रक्रियेस विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. आता पुन्हा नव्याने सीईटी सेलने वेळापत्रकातील कॅप राउंडच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आता १० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्यांची पडताळणी ११ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होऊन त्यावर काही आक्षेप असल्यास उमेदवार १७ नोव्हेंबरपर्यंत ते नोंदवू शकतील.

अंतिम गुणवत्ता यादी ही २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होऊन २२ नोव्हेंबर रोजी जागांचे वाटप करण्यात येईल. तर २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत. २९ नोव्हेंबर रोजी पहिल्या फेरीतील प्रवेशानंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. दुसऱ्या फेरीसाठी काही दुरुस्ती असेल तर ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत करू शकतील. दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ५ डिसेंबर रोजी जाहीर होईल.

२०३० पासून चार वर्षांचा अभ्यासक्रम होणार
शिक्षणशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम असलेला बी.एड. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार २०३० पासून चार वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम होईल. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणातील बदलांनुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाईल.त्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...