आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:राज्यातील 80% हून अधिक नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिएंट’; ‘डेल्टा प्लस’चे 76 रुग्ण, जनुकीय तपासणीतून घेतला जातोय शोध

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या लाटेसोबतच सर्वांच्या चिंतेचा विषय असलेल्या कोरोना विषाणूतील “डेल्टा’ व्हेरिएंटचा शोध घेण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वतंत्र सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून यातून १० अतिरिक्त डेल्टा प्लस रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील “डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ७६ झाली असून एकूण नमुन्यांपैकी ८० टक्क्यांमध्ये साधा “डेल्टा’ व्हेरिएंट आढळून आला आहे.

विषाणूतील जनुकीय बदल हा नैसर्गिक भाग असला तरी साथीच्या पार्श्वभूमीवर त्यास प्रतिबंध घालण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी त्याचा निरंतर शोध घेणे गरजेचे असते. त्या उद्देशाने कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अर्थात सीएसआयआरसोबत राज्य शासनाने केलेल्या करारानुसार हे सर्वेक्षण सुरू आहे. यात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी या महिन्यात आलेल्या अहवालानुसार राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ८०% नमुन्यांमध्ये “डेल्टा’ व्हेरिएंट आढळला आहे, तर १० रुग्णांमध्ये “डेल्टा प्लस’ व्हेरिएंट आढळला. नव्याने आढळलेले कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील १० रुग्ण बरे झाले आहेत.

डेल्टा प्लस रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे ही कार्यवाही
- विभागीय स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम
- रुग्णांचा अभ्यास व निकटवर्तीयांचा शोध
- फ्लूसदृश आजारांचे व सारी आजाराचे सर्वेक्षण
- पुन्हा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा शोध

सर्वसामान्यांनी घाबरण्याचे कारण नाही
डेल्टा प्लस रुग्ण आढळल्यामुळे सर्वसामान्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. स्वतःच्या जनुकीय रचनेमध्ये बदल करत राहणे ही विषाणूची नेहमीची सवय आहे. सध्या डेल्टा प्लस रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये प्रसाराचा वेग वाढलेला दिसत नाही किंवा आजाराची गंभीरतादेखील वाढलेली दिसत नाही. त्यामुळे यासंदर्भात घाबरून न जाता सर्वांनी कोविड अनुरूप वर्तन अंगीकारण्याची आवश्यकता आहे. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

आतापर्यंत आढळलेले ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट
- रत्नागिरी१५ (मृत्यू २)
- जळगाव१३ (मृत्यू नाही)
- मुंबई११(मृत्यू १)
- कोल्हापूर७ (मृत्यू नाही)
- ठाणे व पुणेप्रत्येकी ६ (मृत्यू नाही)
- पालघर३ (मृत्यू नाही)
- रायगड३ (मृत्यू १)
- नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग (प्रत्येकी २ (मृत्यू नाही)
- चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद (प्रत्येकी १) (मृत्यू नाही) { बीड - १ (मृत्यू १)

सर्वाधिक डेल्टा प्लस रुग्ण सक्रिय वयोगटातील
- ७६ पैकी ७१ रुग्ण बरे झाले
- ३७ रुग्ण लक्षण- विरहित
- सक्रिय वयोगटात सर्वाधिक लागण
- १९ ते ४५ वयोगट- ३९
- ४६ ते ६० वयोगट- १९
- १८ वर्षांखालील- ९
- ६० वर्षांवरील- ९
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चसोबत सर्वेक्षण

बातम्या आणखी आहेत...