आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पूर्णवेळ धान्य पुरवठा अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी; मनसेचे निवेदन

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून नाशिकमध्ये पूर्णवेळ धान्यपुरवठा अधिकारी नसल्याने नवीन रेशनकार्ड बनविणे, रेशनकार्डात सुधारणा करणे आदी कामे खाेळंबली आहेत. यासाठी पूर्णवेळ धान्य पुरवठा अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, या मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले की, कुटुंबियांची नावे वाढविणे, वैद्यकीय कामासाठी रेशनकार्ड बनविणे आदी कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आधार सीडिंगचे काम दोन वर्षांपासून बंद आहे. सर्व्हर डाऊनमुळे पॉस मशीन न चालल्याने अनेक नागरिकांना सवलतीत अन्नधान्यास मुकावे लागून दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेले रेशनकार्ड कार्यालय नाशिकरोड येथे हलविल्याने रेशनकार्डाच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड असुविधेला सामोरे जावे लागत असून सदर कार्यालय पुनश्च जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे स्थलांतरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांना देण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळास दिले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, सचिन भोसले, प्रवक्ते पराग शिंत्रे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...