आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण रस्त्याची मागणी ; उपाययाेजनेसाठी आ. फरांदेंनी मांडली लक्षवेधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा विकास झपाट्याने होत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या बाहेरून बाह्यवळण रस्ता करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर अधिवेशनात नाशिक शहरातील वाहतुकीसंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. शहरातून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक- पुणे मार्ग यांसारखे विविध राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात असून ७० किलोमीटरपेक्षा जास्त लांबी ही महामार्गांची आहे. महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहने नागरी भागातून वळविली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली. शहराचा विकास झाल्यानंतर भूसंपादन करणे ही प्रक्रिया अवघड होत असल्यामुळे बाह्यवळण मार्ग करण्यास नागरिक विरोध करत असतात व सदर बाब खर्चिक देखील होत असते. त्यामुळे नाशिक शहरासाठी बाह्यवळण मार्ग करण्याची मागणी त्यांनी केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तर याची दखल घेण्याचे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य शासनाला दिले.

बातम्या आणखी आहेत...