आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील स्फोटाची निवृत्त न्यायाधीशांची समिती गठित करून सखोल चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांना या संदर्भात निवेदन दिले. जखमी व मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी व या जळीतकांडाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सहसंपर्कप्रमुख तथा माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात व्यवस्थापन दुर्घटनेत व्यवस्थापन दुर्घटनेत मृत झालेल्यांचा आकडा लपवित असल्याचा गंभीर आराेप केला आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, उपजिल्ह ाप्रमुख रघुनाथ तोकडे, तालुकाप्रमुख संपतकाळे, तालुका संघटक जयराम गव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. जळीतका डाच्या घटनेनंतर मृतांची आकडेवारी कंपनी प्रशासनाकडून दडवली जात असल्याची तालुका भरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध ्यमांसमोर कुठल्याही प्रकारे वाच्यता करायची नाही, असा सज्जड दम कंपनी प्रशासनाकडून कामगारांना दिला असल्याचीही बाब समोर आली आहे. आपला रोजगार जाईल या भीतीपोटी परप्रांतीय कामगारही घटनेबद्दल मौन बाळगून आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटंले आहे.
इमारतीच्या चौथ्या-पाचव्या मजल्यावर मृतदेहाची असण्याची शक्यता : माजी आमदार मेंगाळ जिंदाल पॉलिफिल्ममध्ये माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांची भूमिका सखोल होत चालली आहे. सुरुवातीलाच त्यांनी घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री यांना याबाबत माहिती देत घटनास्थळी भेट दिली होती. तसेच घटना झाल्यापासून मेंगाळ तळ ठोकून राहिले आहे. दरम्यान, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी सांगितले की, प्लांटच्या ठिकाणी सात-आठ मजली इमारत आहे. त्या इमारतीत अजूनदेखील मृतदेह असू शकतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
अजून काेणी मृत असण्याची शक्यता नाही कंपनी व्यवस्थापनाने एक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळीच प्रशासनाला दिली हाेती. बुधवारी एका कामगाराचा मृतदेह सापडला असून आता अजून काेणी मृत असेल अशी शक्यता बिलकुल वाटत नाही. - दीपक बन्सल, हेड आॅपरेशन, जिंदाल
इमारतीच्या चौथ्या-पाचव्या मजल्यावर मृतदेहाची असण्याची शक्यता : माजी आमदार मेंगाळ जिंदाल पॉलिफिल्ममध्ये माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांची भूमिका सखोल होत चालली आहे. सुरुवातीलाच त्यांनी घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री यांना याबाबत माहिती देत घटनास्थळी भेट दिली होती. तसेच घटना झाल्यापासून मेंगाळ तळ ठोकून राहिले आहे. दरम्यान, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी सांगितले की, प्लांटच्या ठिकाणी सात-आठ मजली इमारत आहे. त्या इमारतीत अजूनदेखील मृतदेह असू शकतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.