आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सेवानिवृत्त पोलिसांना महात्मा फुले आरोग्य योजनेची मागणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा जाेतिबा फुले जनकल्याण आरोग्य योजना लागू करावी तसेच प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण हाेतात. सेवानिवृत्तीनंतर त्या आरोग्याच्या समस्या कायम आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना अल्पशा निवृत्तिवेतनामुळे आर्थिक अडचण निर्माण होत आहे. यासाठी राज्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य जनकल्याण योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासह विविध प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुरेश भामरे, रावसाहेब पोटे, चंद्रकांत बनकर, गोकुळ सुरसे, मोबीन सय्यद आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...