आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा:पोलिस ठाण्याची मागणी; अंबड ग्रामस्थांचा आज नाशिक-मुंबई पायी मोर्चा

सिडकाे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड भागात सततच्या घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी व सक्षम पोलिस अधिकारी नेमावा या मागणीसाठी अंबड ग्रामस्थांच्या वतीने आज ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अंबड, एक्स्लो पॉइंट येथून मंत्रालयावर अर्धनग्न पायी मोर्चा निघणार आहे.

सिडको परिसरातील घरकुल, दत्तनगर, कारगिलनगर, मारुती संकुल, अंबडगाव औद्योगिक वसाहत येथे नागरिकांच्या सुरक्षेेची हमी नसून वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय यांच्या जाचाला कंटाळून, तर प्रशासनास वारंवार सांगूनही या मागणीची दखल घेतली जात नसल्याने मुंबईत मंत्रालयावर पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दरबारी जाऊन गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर माजी नगरसेवक राकेश दोदे, रामदास दातीर, नितीन दातीर, महेश दातीर, शरद कर्डिले, अरुण दातीर, त्र्यंबक मोरे आदींनी दिली. या पायी माेर्चात नागरिकांना सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...