आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:देवळालीतील सार्वजनिक शाैचालय दुरुस्तीची मागणी

देवळाली कॅम्प20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीतील वाॅर्ड क्रमांक पाचमधील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून नागरिकांना उघड्यावर शाैचास जावे लागते. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले.वाॅर्ड क्र. पाचमधील स्टेशनवाडी परिसरातील दलित वस्तीमध्ये बोर्डाने उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाली आहे.

शाैचालयाचे दरवाजे तुटले असून भांडेही खराब झाले आहे. नागरिकांनी बोर्डाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष विक्रम पगारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाॅर्डातील सार्वजनिक शौचालयांच्या समस्यांसह रस्त्याची दुरवस्था याबाबत प्रश्न उपस्थित केले असता डॉ. गजभिये यांनी येत्या दोन दिवसांत यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...