आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडित होणारा विद्युत पुरवठा:सणाेत्सवात सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सव तसेच आगामी सणाेत्सवाच्या काळात देवळाली कॅम्प शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक अरुण जाधव व इतरांनी केली आहे.

काेराेनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर गणेशाेत्सव खुल्या वातावरणात होत असल्याने आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. अनेक मंडळांनी आपल्या सोयीनुसार पुन्हा एकदा सामाजिक धार्मिक व प्रबोधनात्मक देखावे सादर करून गणेशाेत्सव साजरा करण्याची स्पर्धा सुरू केली आहे. मात्र शहरात वेळोवेळी खंडित होणारा विद्युत पुरवठा गणेश मंडळे व भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरवत आहे, ही बाब लक्षात घेऊन वीज मंडळाने सणासुदीच्या दिवसात वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याची मागणी अरुण जाधव यांच्यासह सुरेश कदम, दिनेश हाबडे, रोहित नानेगावकर, कार्तिक बलकवडे आदींनी केली आहे.सध्या जाेरदार पाऊस सुरू असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने देवळाली परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...