आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांवर गुन्हा दाखल करावा:छावा क्रांतिवीर सेनेची मागणी, अंबड पोलिसांना निवेदन

सिडको11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीचं बाेलणे उचित नसून याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेने केली असून याबाबत अंबड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.

आैरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले होते. राज्यपाल सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत आहे. अपमानजनक बोलणं संदर्भहीन बोलणे, वादग्रस्त बोलणे हे राज्यपाल काेश्यारी यांचे एकूण व्यक्तिमत्त्व दिसते. यापूर्वीदेखील राज्यपालांनी असेच अपमानजनक वक्तव्य केलेले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलेले आहे. ते छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारे वक्तव्य आहे. त्यांच्यावर गुन्हा करावा याबाबत छावा क्रांतिवीर सेना नाशिकतर्फे संस्थापक करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी आशिष हिरे, नितिन दातीर, नाशिक शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे, दिनेश नरवडे, शुभम महाले, अर्जुन शिरसाठ, मदन गाडे, बंटी पाबळे, अर्जुन पाटील, धैर्यशील पाटील, दीपक खताळे यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपालांनी यानंतर जर असे वक्तव्य केले तर संघटना राज्यभर आणखी तीव्र आंदाेलन करेल, असा इशारा याप्रसंगी संस्थापक करण गायकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...