आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीत 10 स्वतंत्र घंटागाड्या:उद्याेजकांची मागणी 10 वर्षांनी पूर्ण; आयुक्तांच्या हस्ते आज शुभारंभ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र घंटागाड्या असाव्यात ही उद्याेजकांच्या आयमाची मागणी १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मान्य झाली असून पालिकेने त्यासाठी १० गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी ६ घंटागाड्या अंबड तर ४ सातपूर औद्योगिक वसाहतीत कचरा संकलित करतील. गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आयमा रिक्रिएशन सेंटर येथे शुभारंभ हाेणार आहे.

अंबड आणि सातपूर येथील औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र घंटागाड्या नसल्याने औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचे १०० टक्के संकलन होत नव्हते. गावातून कचरा संकलित केल्यानंतर घंटागाड्या औद्योगिक वसाहतीत येत होत्या आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत होती. औद्योगिक वसाहतीतील संपूर्ण कचरा दररोज उचलला जावा यासाठी लेखी निवेदने दिली. शिष्टमंडळे आयुक्त आणि संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांना भेटले. मात्र परिस्थिती जैसे थेच राहायची. सातत्याने याचा पाठपुरावा सुरू राहिला आणि अखेर उद्योजकांना दिलासा मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. घंटागाड्या शुभारंभ सोहळ्यास उद्याेजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयमाचे सरचिटणीस ललित बूब, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांसह पदाधिकाऱ्यानी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...