आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:सरकारने संमेलनासाठी 50 लाख दिल्यानंतरही नाशिक जि.प.कडे 25 लाख रुपयांची मागणी

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनासाठी शासनाने ५० लाख रुपये दिल्यानंतरही नाशिक महापालिकेनेही तेवढीच रक्कम द्यावी, अशी मागणी स्वागताध्यक्षांनी एका बैठकीत महापाैरांकडे केली हाेती. आता २५ लाख रुपयांच्या निधीसाठी आयाेजकांनी आपला माेर्चा जिल्हा परिषदेकडे वळवला आहे. मात्र, अशी काही तरतूदच नसल्याने असा निधी द्यायचा कुठून असा पेच अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

नाशिकच्या गाेएसाेच्या मैदानात हाेणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निधी संकलनावर प्रामुख्याने काम हाेत आहे. दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधी साहित्य संमेलनासाठी दिला आहे. तेवढाच निधी महापालिकेनेही द्यावा,अशी मागणी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाच्या एका बैठकीत महापाैर सतिश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. तर आता संमेलन आयाेजकांनी जिल्हा परिषदेकडे २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेकडे असा काेणातही निधी देण्याची काहीच तरतूद नसल्याने अधिकारीच पेचात पडले आहेत. मात्र, यावर ताेडगा काढत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लिना बनसाेड यांनी हा प्रस्ताव ग्राम विकास खात्याकडे पाठविण्याच्या सूचना केल्या हाेत्या. त्यानुसार तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

"ग्रामविकास’ राष्ट्रावादीकडे असल्याने निधीची अपेक्षा
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतील हेवीवेट नेते आहेत. त्यांनी राज्य शासनाकडून ३३ टक्के मिळणारा निधी पूर्ण १०० टक्के अर्थातच ५० लाख रुपये मिळवले आहेत. आता ग्राम विकास खातंही राष्ट्रवादीकडेच आहे. हसन मुश्रीफ हे ग्राम विकास खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे मागणी केलेले २५ लाख रुपये मिळण्यातही फार काही अडचणी येणार नाहीत, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...