आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:सिडकोत भाजपासह राष्ट्रवादीचे निदर्शने ; शाईफेक प्रकरणानंतर दाेघा पक्षांचे एकमेकांवर आराेप

सिडको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी व भीमसैनिकांनी पाथर्डी फाटा येथे दुपारी निदर्शने केली तर भाजपने सायंकाळी त्रिमूर्ती चौक येथे पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचा निषेध व्यक्त करत जाेरदार निर्दशने केले.

त्रिमूर्ती चौक येथे भाजपच्या वतीने झालेल्या आंदाेलनावळी पक्षाचे शहराध्यक्ष गिरीष पालवे, महेश हिरे, कैलास आहिरे, मंडल अध्यक्ष शिवाजी बरके, अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.वैभव महाले, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, रश्मी भेंडाळे आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या संबंधितांवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी शहराध्यक्ष पालवे यांनी केली. तर संस्कृतशील महाराष्ट्रात लाेकशाही मार्गाने आंदाेलन न करता शाईफेक करून अवमान केला गेला असल्याची टिका इतर पदाधिकाऱ्यांनी केली.

राष्ट्रवादीकडून पाथर्डी फाट्यावर निषेध भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे व त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, मार्शल ग्रुप, भीम आर्मी, आजाद समाज पार्टी व भीमसैनिकांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी प्रशांत खरात, संदीप मोरे, हेमंत गायकवाड, सुनील खरात, विनोद नाथभजन, विनेश नरवाडे, राजन साळवे, दिनेश मस्के आदी उपस्थित होते. निदर्शने करणाऱ्यांवर अंबड पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. खाेटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा अजून तीव्र आंदाेलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...