आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यकर अधिकारी संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर करा, रिक्त जागा त्वरित भरा, अगरवाल आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य वस्तू सेवा कर अधिकाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून निदर्शने केली. राष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून हे आंदोलन करण्यात आले आहे.
गुरुवारी शहरातील राज्य जीएसटी कार्यालयासमोर संघटनेचे नाशिक क्षेत्राचे उपाध्यक्ष नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी जगदीश पाटील, संगीता साळी, अजय लिटे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. २०१७ मध्ये जीएसटी कायदा लागू केला, करदात्यांची संख्या वाढली, परंतु त्या तुलनेत राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात आल्या नाहीत. किमान ३५० ते ४०० अधिकाऱ्यांच्या जागांवर भरती, गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या अगरवाल आयोगाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.