आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू पाॅझिटिव्ह:एकाच्या मृत्यूनंतर डेंग्यू उत्पत्ती केंद्र नष्टतेची माेहीम

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर येथील मयत युवकाच्या नमुन्यांचा अहवाल मनपा प्रशासनाला दुसऱ्याच दिवशी शनिवारी (दि. १९) प्राप्त झाला असून डेंग्यूची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे मनपाला आता प्रतिबंधित क्षेत्रातील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी जाग आली आहे. पालिकेचे जीवशास्त्रतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतील नागरिकांच्या नमुने घेऊन डेंग्यूची चाचणी केली जात आहे.

दर आठवड्याला याबाबतचा अहवाल प्रशासनास सादरही केला जाताे. नाेव्हेंबर महिन्यात १८ तारखेपर्यंत ३००० नागरीकांच्या रक्तांचे नमुने घेण्यात आले हाेते. त्यापैकी ५७८ नमुने पाॅझिटिव्ह आले हाेते. शनिवारी २७ संशयित नागरिकांचे नमुने तपासणीनंतर चार जणांचे नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. करन्सी नाेट प्रेस, आर्टिलरी सेंटरशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असून वीज वितरण केंद्रातील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली आहेत.

वीज वितरण कंपनीच्या आवारातील केंद्र नष्ट
पालिकेच्या पथकाने वीज कंपनीच्या आवारातील डेंग्यूची उत्पत्ती केंद्रे नष्ट केली. समाधानाची बाब म्हणजे वीज कंपनीने डेंग्यूची उत्पत्ती राेखण्यासाठी प्राथमिक उपाययाेजना म्हणून गप्पी मासे पाळलेले असल्याची माहिती जीवशास्त्रतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र त्रंबके यांनी दिली.

करन्सी नाेट प्रेसमध्ये देणार गप्पी मासे
पालिकेच्या वतीने करन्सी नाेट प्रेस प्रशासनाला मेल पाठवून डेंग्यूची उत्पत्ती केंद्र नष्ट करण्याबाबत सांगितल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. जीवशास्त्रतज्ज्ञ डाॅ. त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेसच्या आवारातील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली. विशेष म्हणजे प्रेसच्या आवारात गप्पी मासे पाळण्यासाठी कृत्रिम तलावदेखील तयार करण्याचे काम हाती घेतले. महापालिका प्रशासनाच्या वतीने तलावात गप्पी मासे साेडण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...