आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंदाल’ आग प्रकरण:औद्याेगिक सुरक्षा विभाग अ‍ॅक्शन माेडवर; ‘जिंदाल’ आग प्रकरणाची चाैकशी सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीला लागलेल्या भयानक आगीच्या घटनेची चाैकशी औद्याेगिक सुरक्षा आणि आराेग्य संचालनालयाने सुरू केली आहे. गुरुवारी आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर विभागाकडून कारखाने अधिनियम अंतर्गत ही चाैकशी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी न्यायवैद्यक प्रयाेगशाळेच्या (फाॅरेन्सिक) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत नमुने घेतल्याने आता कंपनीवर कारवाई हाेण्याचे दाट संकेत मिळत आहेत. जिंदाल कंपनीच्या या आगीत आत्तापर्यंत तीन कामगार मयत झाल्याचे समाेर आले असून सुयश हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आठ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. घटनास्थळी बुधवारपर्यंत धुर असल्याने तसेच परीसरातील इमारत कमकुवत बनल्याने धाेका वाढला असून तपास यंत्रणांना पाेहाेचणे शक्य हाेत नव्हते.

धुरासह आगही पूर्णपणे आली आटोक्यात औद्याेगिक सुरक्षा आणि उपसंचालनालयाच्या पथकाला रिकाम्या हाताने परत यावे लागत हाेते. गुरुवारी धूर आणि आग थांबल्याने पथकाने प्रत्यक्ष चाैकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या कंपनीतील अधिकाऱ्यांची चौकशी हाेण्याची शक्यता आहे. एकूणच हे प्रकरण आता नेमके कुठे जाते हे पाहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...