आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis' Assurance At Mahanubhava Samela Of Nashik That A Marathi Language University Will Be Established At Siddhpur.

सिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत ठोस निर्णय घेऊ:महानुभाव संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र रिद्धपूर भगवान श्री चक्रधर स्वामींनी मराठीतील पहिला आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला, याच ठिकाणी मराठीचा जन्म झाला, पहिला कविता गायली गेली अशा ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. गेले दाेन-अडीच वर्ष याबाबत काही निर्णय घेतला गेला नाही. मात्र आता महानुभाव पंथाचे आर्शिवाद प्राप्त सरकार सत्तेत आले आहे. यामुळे रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापना करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेवून ठाेस निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भगवान चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी जन्माेत्सवा निमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन डाेंगरे वस्तीगृह मैदानावर सुरू आहे. या संमेलनात मंगळवारी (ता. 30) उपमुख्यमंत्री फडणवीस बाेलत हाेते.

यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, चक्रधर स्वामींनी 800 वर्षांपूर्वीच महाराष्ट्री असल्याचे सांगितले हाेते. समाजातील जातीभेद दूर करण्याबाबत अहिंसेचा शब्द त्यांनी दिला. स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला. स्वामींचे कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे. स्वामींचे लिळाचरीत्र हे मराठीचे आद्यग्रंथ आहे. सिध्दपूर विकास आराखडा मंजूर असून त्यासाठी 298 काेटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे.

विद्यापीठ उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कॅबिनेट मंंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, महानुभाव पंथियाच्या या मेळावा जणू काही नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याची अुनभूती देत आहे. महानुभाव पंथाच्या सर्व मागण्या राज्यसरकार पूर्ण करतील असेही त्यांनी सांगितले.चक्रधर स्वामींकडे वैज्ञानिक दृष्टीकाेन हाेता. लिळाचरित्राच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद दूर केला असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

यावेळी संमेलनाचे प्रमुख आयोजक दिनकर अण्णा पाटील यांनी महानुभाव पंथाच्या विविध ठरावांचे वाचन केले, तसेच या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी केली, या ठरावांचे वाचन सुरू असताना उपस्थित हजारो भाविकांनी पंचकृष्ण नावाचा जयघोष केला. याप्रसंगी दत्ता गायकवाड आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन, आमदार एकनाथ खडसे, देवयानी फरांदे, राहूल ढिकले, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, कविश्वर कुलाचार्य विद्वांस बाब, महंत कारंजेकर बाबा, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, बाळासाहेब सानप यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी उपस्थित होते..

बातम्या आणखी आहेत...