आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:धार्मिक ग्रंथाचा अवमान;‎ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वीडनमध्ये धार्मिक ग्रंथाच्या‎ झालेल्या विटंबनेमुळे मुस्लिम‎ बांधवांच्या भावना दुखावल्या‎ गेल्या आहेत. यामुळे शुक्रवारी‎ (दि.३) शहरातील सर्व मशिदींमध्ये‎ जुम्माच्या नमाजानंतर तीव्र शब्दात‎ निषेध नोंदविण्यात आला. तसेच,‎ खतीब-ए-शहर हाफिज‎ हिसामोद्दीन साहब खतीब यांच्या‎ नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदन देत भारत सरकारने‎ स्वीडिश सरकारला कडक शब्दात‎ याची जाणीव करून द्यावी, अशी‎ मागणी करण्यात आली.‎

स्वीडनमध्ये घडलेल्या या‎ घटनेचा निषेध करून देशाच्या‎ राष्ट्रपतींना निवेदन पाठवून‎ आपल्या देशाने स्वीडन‎ सरकारकडे याबाबत नाराजी व्यक्त‎ करून आमच्या भावना‎ पोहोचवाव्यात तसेच विटंबना‎ करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी‎ मागणी ही निवेदनात करण्यात‎ आली आहे.‎ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या‎ माध्यमातून हे निवेदन राष्ट्रपतींना‎ रवाना करण्यात आले.‎

यावेळी खलिफा ए हुजुर‎ मोइनुल मशाइख हाफिज समीर‎ कोकणी,कारी फैय्याज बरकाती‎ यांच्यासह मुस्लिम बाधव उपस्थित‎ होते. शुक्रवारी जुम्माची विशेष‎ नमाज पठण झाल्यानंतर शहरातील‎ सर्वच मशिदींत या घटनेचा तीव्र‎ शब्दात निषेध नोंदविण्यात आला.‎ २१ जानेवारीला ही घटना घडली‎ असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या‎ भावना दुखावल्या गेल्या आहेत.‎ ठिकठिकाणी यामुळे नाराजी व्यक्त‎ होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...