आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:चार वेळा प्रवेश मुदतवाढ देऊनही डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांची पाठच

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक-दोन वेळा नव्हे, तर सलग पाचव्यांदा पाॅलिटेक्निक डिप्लोमा प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली असूनही नाशिक विभागात यंदा अद्याप पूर्ण क्षमतेएवढे अर्ज प्राप्त होऊ शकल नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन तसेच सीबीएसइच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रवेशाची संधी मिळावी यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेशासाठीा पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अर्जासाठी आता ४ ऑगस्टपर्यंत संधी असेल तर ९ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना अकरावीबरोबरच तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध असून तीन वर्षांच्या पाॅलिटेक्निक डिप्लोमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. पाॅलिटेक्निकसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ३० जूनपर्यंत अर्जासाठी मुदत दिली होती. त्यानंतर सलग पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार ४ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. आतापर्यंत नाशिकसह विभागात २३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केेली नाही, त्यांच्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन डीटीइच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑगस्टमध्ये प्रवेशप्रक्रिया
राज्यात बहुतांश ठिकाणी काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सीबीएसइच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा प्रवेश अर्जासाठी पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ मिळेल.

बातम्या आणखी आहेत...