आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआरोग्य बिघडले:उपचार मोफत असूनही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थींकडून काही रुग्णालयांनी 15 कोटी रुपये उकळले

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. मात्र या याेजनेचेच आरोग्य बिघडले आहे. रुग्णालये उपचारांसाठी रुग्णांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे आल्या आहेत. एकूण ३४,५१६ तक्रारींपैकी तब्बल ८३% म्हणजेच २८,६६४ तक्रारी पैशांसंदर्भात असल्याचे समोर आले आहे. यात लाभार्थींकडून एकूण १५ कोटी ८५ लाख ६८,८८२ रुपयांची मागणी करणाऱ्या तक्रारी आहेत. सोलापूर जिल्हा अव्वल असून ४,१३५ तक्रारींपैकी ३७७४ तक्रारी या पैशांसंदर्भातील आहेत.

राज्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जाते. यात गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. मात्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थींकडून तपासणी आणि सुविधांच्या नावाखाली जादा रक्कम घेतली जात आहे. औषधांसाठीही जादा दर दाखवून रुग्णांचा खिसा रिकामा केला जात आहे. इतर तक्रारींत पात्र रुग्णांवर उपचारांना नकार देणे, प्रवास खर्च न देणे, रुग्णालयात वाईट सेवा देणे, रुग्णांकडे दुर्लक्ष करणे आदींचा समावेश आहे.

२६,४६६ तक्रारींचा निपटारा
राज्यात राबवल्या जाणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून लाभार्थींकडून पैसे घेतल्याच्या २८,४६४ तक्रारी जीवनदायी भवन यांच्याकडे प्राप्त झाल्या.

काही रुग्णालयांनी रुग्णांकडून १५ कोटी ८५ लाख ६८,८८२ रुपये उकळले आहेत. यातील २६,४६६ तक्रारींचा निपटारा करत रुग्णांना १० कोटी ७९ लाख ८८,४६९ रुपये परत करण्यात आले आहेत.

अशा आहेत जिल्हानिहाय तक्रारी
कोकण :
मुंबई ३८६८
ठाणे १२२०
रत्नागिरी २९४
पालघर १३९
सिंधुदुर्ग ७०
रायगड १५५४

मराठवाडा :
औरंगाबाद १३६७
नांदेड ९६१
बीड २१६
उस्मानाबाद २३१
हिंगोली ९६
जालना ३४२
परभणी २२५
लातूर ४२७

पश्चिम महाराष्ट्र :
कोल्हापूर १६२४
पुणे २३०४
सांगली १६१९
सातारा १०३९
सोलापूर ४१३५

उत्तर महाराष्ट्र :
नाशिक १५९०
जळगाव १५६४
धुळे ७१८
नंदुरबार ३२
अहमदनगर २७७१

विदर्भ :
अमरावती ४५७
भंडारा ३१
बुलडाणा ४७६
चंद्रपूर ६३६
गडचिरोली ३०
गोंदिया ५२५
वर्धा १३१०
वाशिम ४११
अकोला ३९०
यवतमाळ ३५५५
नागपूर १५८९

रुग्णालयांना बजावल्या नोटिसा
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत काही रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विविध प्रकारच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जातात. मात्र, सर्वाधिक तक्रारी पैसे घेतल्याच्याच आहेत. यात भरती करताना अॅडव्हान्स जमा करणे, तपासण्यांचे व इतर शुल्काच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे घेतले जातात. आमच्याकडून संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या. तब्बल २६ हजार लोकांना १० कोटींवर पैसे रिफंड केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...