आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मनपाचा निर्णय:गणेश विसर्जनाकरीता 71 ठिकाणांची निश्चिती; नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर नाशिक मनपा प्रशासन गणेश विसर्जनाच्या जोरदार तयारीला लागले असून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सहा विभागात गणेश विसर्जन ठिकाणी विविध कामे पूर्ण केली जात आहेत. देवळाली गावात गणेश विसर्जन ठिकाणी जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत.

पुलकुंडवार यांचे आवाहन

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, की त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये.मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करण्यात यावे. नागरिकांना दीड, तीन, पाच, सात दिवसाच्या मुर्तींचे विसर्जनाकरिता नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील.

गणशाचे थाटामा​​​​​​​टात स्वागत

तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे आगमन भक्तांनी मोठ्या थाटामाटात केले. असे असताना दीड दिवसांचे गणेशाचे विसर्जनही काल गुरुवारी (01 सप्टेंबर) करण्यात आले. यानंतर दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नाशिक मनपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवाय रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच बांधकाम विभागाकडून डांबर आणि खडीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर आता गणेश विसर्जन ठिकाणी कामे केली जात असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.

दहाव्या दिवशी विसर्जनासाठी कृतीन स्थळ

कृत्रीम विसर्जन स्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जना करीताच उपलब्ध असतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सर्गिक, कृत्रिम ठांची निश्चिती

ही आहेत कृत्रिम विसर्जन स्थळे

  • पूर्व विभाग: लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, नंदिनी गोदावरी संगम.
  • नाशिक रोड : दसक घाट, चेहडी गाव दारणा नदी, देवळाली गाव वालदेवी नदी, विहीतगाव वालदेवी नदी, वडनेर गाव वालदेवी नदी.
  • पंचवटी : म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.
  • सिडको : पिंपळगाव खांब वालदेवी घाट
  • पश्चिम विभाग : यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट,
  • सातपूर : गंगापूर धबधबा, गंगापूर अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी.
बातम्या आणखी आहेत...