आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मालकी हक्क निश्चिती; चौकशीची प्रक्रिया सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक महापालिका विस्तारीत क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या मौजे नाशिक या गावाच्या हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन नकाशे तयार झाले आहेत. त्यांचे मालकी हक्क निश्चित करण्यासाठी मिळकतीच्या हक्क चौकशीची कामेही सुरू करण्यात आली असून त्यासाठी मालमत्ताधारकांनी नाेटीस प्राप्त हाेताच हजर राहण्याचे आवाहन भूमीअभिलेख कार्यालयाने केली आहे.

विशेष उपअधीक्षक भूमीअभिलेख तथा चौकशी अधिकारी किशोरचंद्र देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका विस्तारीत क्षेत्रात नोव्हेंबर, २०२२ मध्ये मौजे नाशिक येथील सर्व्हे नंबर ८७७, ८७८, ८८७ व ८८८ मधील मिळकतीचे हक्क चौकशीचे काम उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्यामार्फत हाेणार आहे. हक्क निश्चिती व चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर नकाशे अंतिम करून मालमत्ता पत्रक तयार हाेणार आहे.

त्या अनुषंगाने मिळकतधारकांनी पुराव्याच्या कागदपत्रांअभावी संभाव्य त्रुटी टाळण्यासाठी त्यांचे हक्क सिद्ध करणारे पुरावे, विशेष उपअधीक्षक भूमीअभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्रमांक १, मनपा पश्चिम विभागीय कार्यालय, नवीन पंडित कॉलनी येथे सादर करावेत. नोटीस प्राप्त झाली असल्यास ती नोटीस सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच मिळकतीचा नकाशा व हक्काची नोंद याचीही खातरजमा करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...