आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:देवळालीतील रस्त्यांची दैना; वाहनधारक प्रशासनावर नाराज

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली शहर परिसरात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालवितांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या कामकाजावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवळाली कॅम्प शहरातील प्रवेशद्वार असलेल्या हौसनरोडवर सतीश कॉम्प्लेक्सजवळील रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली असून शहरातील प्रमुख रस्ते असलेल्या मेन स्ट्रीट, मस्जिद स्ट्रीट वडनेररोड, आनंदरोड येथे जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांमधून या कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. देवळालीतील रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे छाेटे-माेठे अपघात होत आहेत. देवळाली कॅन्टोन्मेंट बाेर्ड प्रशासनाने तातडीने जागोजागी पडलले हे खड्डे बुजवावेत अशी मागणी देवळाली व्यापारी बँक संचालक अरुण जाधव, वैभव पाळदे, लखन डांगळे, दीपक उन्हवणे, रोहित नानेगावकर आदींसह वाहनचालक व नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...