आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण आशिया महासंघात १८० कोटी लोकसंख्या आहे. सर्वाधिक गरीब लोक या महासंघातील पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, भारतात असून त्यांची स्थिती सुधारण्याची गरज आहे. भाईचारा आणि परस्पर सहकार्यानेच दक्षिण एशिया महासंघाचा विकास होऊ शकतो. भारत व पाकिस्तान यांच्यात प्रत्यक्ष व्यापार झाल्यास दोन्ही राष्ट्रांना त्याचा फायदा होइल. शांततेच्या मार्गानेच काश्मीरसह इतर सर्वच प्रश्न सुटू शकतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. देशात एकता कायम रहावी यासाठीही प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वसंत व्याख्यानमाला या संस्थेच्या ९९ व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचा प्रारंभ रविवारी (दि.१) सायंकाळी ७ वाजता देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, माजी सनदी अधिकारी विलास ठाकूर उपस्थित होते. व्यासपिठावर वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, संगीता बाफना, अरुण नेवासकर, वसंत खैरनार, शेखर शहा, सुरेश कपाडिया, विश्वास मदाने, गणेश भोरे आदी उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी पहिले पुष्प ‘अखंड भारत नव्हे - २०४७ पर्यंत भारत, पाकिस्तान, बांगलादेशसहीत एशिया महासंघ आणि या महान उद्दिष्टासाठी हिंदू-मुस्लिम एकतेची गरज’ या विषयावर गुंफले. ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात शांतता रहावी अशी अपेक्षा आहे. ७५ वर्षांत इथले लोक तिथे जाऊ शकले ना तिथले लोक इकडे येऊ शकले. २०४७ पर्यंत दक्षिण एशिया महासंघ होण्यासाठी काय करावे? आईनस्टाईन लिहितात की हा गहन विचार आहे.
ज्या समस्येमधून समस्या निर्माण झाली ती समस्या दूर होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयसेवक संघ परिवाराने प्रामुख्याने एकतेचा विचार करावा. नाशिक तालिम संघातर्फे गोरक्षनाथ बलकवडे आणि वाळू नवले यांनी सुधींद्र कुलकर्णी यांना चांदीची गदा भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.