आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संगणक तंत्रज्ञानाने अणुविद्युत, दूरसंचारचा विकास‎

इंदिरानगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआेटी व रासबेरी पाय तंत्रज्ञानावर ‎गुरुगाेबिंद सिंग‎ पॉलिटेक्निकमध्ये दिवसीय कार्यशाळा ‎ नुकतीच झाली. आधुनिक तंत्रज्ञानाला ‎संगणकाची जाेड दिल्यावर अणुविद्युत‎ अन् दू रसंचार विभागाचा विकास हाेत ‎ असून या क्षेत्रात भविष्यात तरुणांना ‎करिअरच्या अनेक संधी असल्याचे ‎कार्यशाळेत नमूद करण्यात आले.‎ रासबेरी पाय हा क्रेडिट कार्डाच्या ‎आकाराचा संगणक असून संगणक ‎तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक आहे.

‎ अणुविद्युत आणि दूरसंचार विभाग व‎ इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड‎ टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स(IETE‎ नाशिक चॅप्टर) यांच्या संयुक्त विद्यमाने‎ इंटरनेट ऑफ थिंग्स आणि रासबेरी पाय‎‎ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेत‎ गुरुगाेबिंद सिंग तंत्रनिकेतनमधील‎ विविध विभागातील तृतीय वर्षात‎ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग‎ नोंदवला. यात संतोष कांबळे, प्रमुख‎ संशोधन आणि विकास, सायट्रॉनिक्स,‎ नवी मुंबई व ऋत्विक ताडे, व्याख्याते,‎ इअॅण्डटीसी विभाग यांनी वरील‎ कार्यशाळे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना‎ अनुक्रमे आयआेटी आणि रासबेरी पाय‎ यावर सखोल प्रात्यक्षिक दिले.‎ कार्यशाळेच्या सांगता सोहळ्यास‎ एम.एस. रावत,प्रधान महाप्रबंधक,‎ दूरसंचार आणि एस.ए.भदाणे,‎ विभागीय अभियंता, दूरसंचार यांना‎ प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात‎ आले होते. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन इअॅण्डटीसीचे‎ विभागप्रमुख संध्या करांडे आणि‎ संस्थेचे प्राचार्य श्रीहरी उपासनी यांनी‎ विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...