आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी:50 गावांमध्ये 10 लाखांची होणार विकासकामे, खासदार गोडसेंची माहिती

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या लोकसभा मतदार संघासाठी शासनाच्या लेखाशिर्ष 2515 या योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

या निधीतून ग्रामीण भागातील सुमारे पन्नास गावांमधील विकास कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे .शासनाने पाच कोटीचा निधी मंजूर केल्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पन्नास गावांमध्ये प्रत्येकी दहा लाखांचा निधी विकास कामांसाठी खर्च केला जाणार आहे

इगतपुरी आणि नाशिक या दोन तालुक्यांमधील गावांचा विकास होणे कामी शासनाच्या लेखाशीर्ष 2515 या योजनेअंतर्गत निधी मिळावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचे काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.यासाठी खा.गोडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना लेखाशिर्ष 2515 या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणे देण्यासाठी गळ घातली होती.

कामाला लवकरच होणार सुरुवात

खा.गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने नुकतेच शासनाने पत्रक काढून नाशिक आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमधील गावांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यातून नासिक आणि इगतपुरी तालुक्यातील प्रत्येकी पंचवीस गावांमधील विकासकामे करण्यात येणार आहेत.पन्नास विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.

या गावांमध्ये उभे राहणार सभागृह

नाशिक तालुक्यातील चांदशी, संसरी,लहवित,ओढा,सय्यद पिंपरी,नानेगाव, बेलतगव्हाण, शेवगेदारणा, बेलगाव ढगा, माडसांगवी, विंचूरदळवी ,जानोरी, दरी, गोवर्धन, गिरणारे, दुगाव, मुंगसारे,आंबेबहूला,तळेगाव राजूरबहूला, लाखलगाव, नानेगाव, चांदगिरी या रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर इगतपुरी तालुक्यातील कुरुंदवाडी, जामुंडे,भावली, पिंपरी, तळोशी,आंबेवाडी ,तळोदा, नांदगाव, नांदूरवैद्य, कुन्हेगाव, बेलतगव्हाण, मुरब्बी, पाडळी, निनावी, कवडधरा या गावांमध्ये सभागृह उभारण्यात येणार आहेत.

या गावात होणार रस्त्याचे काँक्रिटीकरण

याबरोबरच इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आधारवड, शेंगवेडांग,वाघेरे, माणिकगाव खांब,पिंपळगाव भटाटा,मुंढेगाव, रायआंबे, पिंपळगाव मोर, मुकणे,वांजोळे या गावांमधील रस्त्यांचे काँक्रीटकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...