आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:अमृता फडणवीस यांच्या 'त्या' ट्वीटचा चुकीचा अर्थ काढू नये; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

नाशिक3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई शहर राहण्यास असुरक्षित असल्याचे ट्वीट केले. यानंतर शिवसेनेनं त्यांच्यावर टीका केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अमृता फडणवीस यांनी केलेले ट्वीट सुशांत सिंह यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये', असे फडणवीस यांनी नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, 'मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. परंतू, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवे', असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अमृता फडणवीस यांनी कोणते ट्वीट केले होते

अमृता फडणवीस यांनी लिहिले की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. "