आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Devendra Fadnavis Is The Future Chief Minister; BJP State President Bawankule's Claim At The Felicitation Ceremony Of Tailik Mahasabha| Marathi News

नागरी सत्कार:देवेंद्र फडणवीसच भविष्यातील मुख्यमंत्री; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा ताैलिक महासभेच्या सत्कार साेहळ्यात दावा

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काळात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नेतृत्व करतील, तेच मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. भाजपा प्रदेशध्यक्षपदावर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच नाशकात आल्याने त्यांचा रविवारी (दि. ११) कालिदास कलामंदिर येथे श्री संताजी मंडळ व महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेंतर्गत नागरी सत्कार करण्यात आला.

या समारंभाप्रसंगी ते बाेलत हाेते. ताैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला बावनकुळे यांचा गाैरव करीत महासभेचे पदाधिकारी तथा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी मनाेगतात बावनकुळे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे, आपणच भविष्यात मुख्यमंत्री व्हावे, अशी समाजाची अपेक्षा असल्याचे सांगितले. हाच धागा धरत बावनकुळे म्हणाले की, जेव्हा माझे तिकीट कापले तेव्हा वाटले नव्हेत की परत मला आमदार करतील, त्यापाठाेपाठ प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती हाेईल. परंतु, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह केंद्र व राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली.

बातम्या आणखी आहेत...