आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे काहीसे नाराज मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी पाठपुरावा करूनही आवश्यक पाऊले उचलली जात नाही. हे बघून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेत संबधित प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी साकडे घातले.
भाजपने संधी गमावली
चांगल्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याची आयतीच संधी भाजपने गमावल्याचे चित्र असून यानिमित्ताने मंजुरी मिळाली तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी व शिंदे गटाचे महत्व वाढणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भुजबळ यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाशीसंलग्न 100 विदयार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैदकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे रूग्णालय आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संस्था इमारतीचा प्रकल्प मंजुर केला.
10 फेब्रुवारी2021 राेजी राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिल्यानंतर 5 एप्रिल 2021 राेजी शासन निर्णयही प्रसिद्ध झाला. या प्रकल्पासाठी जवळपास 627 काेटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. आराेग्य विज्ञान विद्यापीठाने यासंदर्भातील प्रस्ताव 29 मार्च राेजी शासनालाही पाठवला. 5 ऑगस्ट 2022 राेजी मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत विषयाला मंजुरी मिळाली. मात्र, या प्रकल्पाच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. तसेच शासन निर्णयही निघालेला नाही.
विशेष म्हणजे त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस व महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्याचेही भुजबळ यांनी नमुद केले आहे. भाजपाकडून दाद मिळत नसल्याचे बघून त्यांनी थेट शिंदे यांच्याकडे धाव घेत प्रकल्प मंजुरीसाठी साकडे घातले आहे. भाजपाला खिंडीत गाठतानाच राष्ट्रवादीने शिंदे गटालाही महत्व वाढवण्याची संधी दिली आहे.
भाजपची चुप्पी का ?
शासकीय मेडीकल काॅलेज झाल्यास त्याचे माेठे श्रेय भाजपाला मिळू शकते. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी यापुर्वी प्रकल्प मंजुरीसाठी वारंवार पाठपुरावा केला मात्र, अशी काेणतीही अडचण आहे की, या प्रकल्पाबाबत भाजपने चुप्पी साधली आहे असा प्रश्न आहे. भाजपच्या चुप्पीमुळे खासदार हेमंत गाेडसे हेहीृ या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी फिरत आहेत.
आघाडी सरकारमुळेच खाेळंबा
मी स्वत: मार्च महिन्यातील अधिवेशनात मेडीकल काॅलेज सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तेव्हा पावसाळी अधिवेशनापुर्वी प्रक्रीया पुर्ण हाेईल असे आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र, ते पुर्ण झाले नाही. आघाडी सरकारच्याच काळात खाेळंबा झाला. आता भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. - अॅड. राहुल ढिकले, आमदार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.