आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर महाअभिषेक:कार्तिकी एकादशीनिमित्त सातपूरमधील मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सातपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वररोडवरील समृद्धनगर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे पाच वाजता राजेश देशपांडे व सीमा देशपांडे यांच्या हस्ते महापूजा व वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने महाआरती करण्यात आली.महाआरतीप्रसंगी समृद्धनगर महिला भजनी मंडळाचाही सहभाग होता. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. एकादशीनिमित्त दिवसभर भजन, प्रवचन आदी कार्यक्रम मंदिर समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवसभर भक्तांनी रांगेत दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य नारायणराव कुलकर्णी, श्रीराम मंडळ (मंडलिक), पी. एन. सोनवणे, मच्छिंद्र शेळके, भागवत कुटे आदी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...