आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:धम्म परिषद  अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन; जागरूक राहण्याचा सल्ला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात माॅरल पाेलिसिंग कायदा आणण्याचा प्रयत्न हाेत असून घटनेने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य या कायद्यामुळे नष्ट करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही आतापासूनच जागरूक रहा, असा सल्ला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी धम्म परिषदेत दिला. नाशिकमध्ये प्रथमच आयाेजित करण्यात आलेल्या धम्म परिषदेस राज्याच्या विविध भागांतून डाॅ. आंबेडकरांचे अनुयायी आले हाेते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बाेलताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, या देशात आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्ने हाेतात. समाजव्यवस्थेने ते स्वीकारले आहे. त्यातील विकृतीचा मुद्दा धरून तसा कायदा करण्याचा प्रयत्न हाेत आहे.

मंदिर आंदाेलनामुळे मिळाले आरक्षण : काळाराम मंदिराचे आंदाेलन पाच वर्षे का चालवले याची माहिती देताना अॅड. आंबेडकर म्हणाले, हे आंदाेलन डाेक्याने चालवण्यात आले. काळाराम मंदिर हे आंदाेलनाचे प्रतीक आहे.त्यावेळी इंग्लंडमध्ये हाेणाऱ्या गाेलमेज परिषदेत भारतातील कायद्यांचे मसुदे तयार हाेत हाेते.

या पाच वर्षांच्या काळात डाॅ. आंबेडकरांनी गाेलमेज परिषदेत आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे लक्षात आणून दिले. मात्र पहिली परिषद काँग्रेसने रद्द केली. दुसऱ्या गाेलमेज परिषदेच्यावेळी आंदाेलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्याचे सांगत परिषदेने आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी विशेेष अधिकार दिले. त्यामुळे आरक्षण मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...