आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Dhamma Worshiper Mahashramner's Rally Draws Attention; Eye catching Lifelike Appearances Of Legends In Attractive Pictorials| Marathi News

दिव्य मराठी विशेष:धम्म उपासक महाश्रामणेर रॅलीने वेधले लक्ष; आकर्षक चित्ररथात महापुरुषांचे लक्षवेधी सजीव देखावे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महा बौद्ध धम्म मेळावा आणि महा श्रामणेर शिबिराच्या निमित्ताने शनिवारी (दि. १) दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ हजार धम्म उपासक व श्रामणेर यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये बुद्ध व भीम गीते लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

शालिमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, शालिमार चौक, द्वारका, उपनगर, बिटको, नाशिक रोड मार्गे तक्षशिला शाळा येथे आली या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. आकर्षक फुलांनी सजावट केलेल्या रथात सर्वात पुढे भगवान गौतम बुद्धाचा भव्य पुतळा एका रथावर ठेवण्यात आला होता. त्यामागोमाग रथावर भगवान बुद्धांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा, मग महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा सजीव देखावा होता.

हे लक्षवेधी देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले होते. दरम्यान, शहरातील विविध ठिकाणी या रॅलीत सहभागी उपासक व श्रामणेरांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीमध्ये भन्ते ज्ञानज्योती, भन्ते नागसेन, भन्ते धम्मरत्न, भन्ते बोधीपाल, भन्ते महामोगल्यायन, भन्ते सारीपुत्र, भन्ते कौटिण्य आदी सहभागी झाले होते.

शिबिरांच्या माध्यमातून विज्ञानवादी धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी शिबिराचे संयोजकांनी आयोजन केलेले आहे. आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन आढांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ,राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...