आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी समाजात ४३० हून अधिक जातींचा समावेश आहे. आपण सर्व एकाच घरात राहताे. मात्र तुम्हाला माेठे घर पाहीजे आहे. पण आता तर हे छाेटे घर पडायला आले असून आता तरी एक व्हा. तुमच्या-आमच्या कामात विघ्नहर्त्यांपेक्षा विघ्नकर्त्यांची संख्याच जास्त असल्याचे, अन्न व नागरी ग्राहक मंत्री छगन भुजबळ यांनी धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मल्हारराव होळकर जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात म्हटले.
धनगर समाजाच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या ३३० व्या जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते समाजाचे नेते तथा साेलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा कालिदास कला मंदिर येथे पिवळा फेटा, घाेंगडी व काठी देऊन नागरी सत्कार करण्यात आले.
खोटे बोलून काेणी मोठे होत नाही : मंत्री दत्तात्रय भरणे
आरक्षणाच्या नावाखाली समाजातील काही मंडळी स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासी समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नागरी ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. अनुसुचित जमातीचे आरक्षण हा पुढचा भाग असून तरुणांना भडकावून, खोटे बोलून कोणी माेठं होत नसल्याची, प्रतिक्रिया मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.