आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनाधिकृत खतांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. याबाबत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला माहिती मिळाली असता येथील गुणवत्ता नियंत्रण विभागाने धुळे जिल्ह्यातील बेहेड येथे अनाधिकृत आणि विनापरवाना असलेल्या द्रवरुप खत विक्री केंद्रावर छापा टाकुन साठा जप्त करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील बेहेड येथील मे.धनदाई अँग्रो एजन्सीकडे नाशिक येथील सातपुर च्या मे.एग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.सातपुर यांनी उत्पादित केलेल्या 19:19:19, 00.52:34, 12:61, 13:4013, 24:24:24 ही द्रवरुप खते पाच लिटर कॅनमधील साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे.
कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विभागीय गुणवत्ता नियंत्रँण निरिक्षक नितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी प्रदिप निकम, अभय कोर, रमेश नेतनराव यांनी छापा मारुन ही कारवाई केली. या पथकाने अनाधिकृत व विना परवाना खतांचा 18 हजार रुपये किमतीचे 60 लिटर साठा जप्त केला आहे. संशयित विनोद जयाजी तोरवणे यांच्या विरोधात खत नियंत्रण आदेश 1985 , अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी अनाधिकृत व विना परवाना खते खरेदी करू नयेत तसेच खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून पक्की पावती घेऊन खरेदी करावीत असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.