आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात काेराेनाचा वाढता कहर पाहाता सर्वत्र भीतिदायक वातावरण निर्माण झाले असले तरी नाशिकचे हृदयराेग व मधुमेहतज्ज्ञ डाॅ. अतुल वडगावकर यांनी एक अनोखा पॅटर्न राबवत रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा दिला आहे. रुग्णांच्या केवळ ‘एक्स-रे’ रिपाेर्टद्वारे खुल्या रुग्णालयात उपचार करीत आणि गृहविलगीकरणाचा पर्याय देत त्यांनी आजवर तब्बल दहा हजारांहून अधिक जणांना काेराेनामुक्त करीत अाशादायी चित्र निर्माण केले अाहे. विशेष म्हणजे, वयाची १०४ वर्षे पूर्ण केलेल्या एका वृद्धेवर त्यांनी यशस्वी उपचार केले तसेच ८६ वर्षांच्या अाजींचा एचआरसीटी स्काेअर १९ असतानाही त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल न करता योग्य वेळी निदान, उपचार आणि खबरदारी या त्रिसूत्रीवर घरीच काेराेनामुक्त करण्यात डाॅ. वडगावकर यशस्वी ठरले अाहेत.
योग्य वेळी निदान, उपचार आणि खबरदारी
सरकारी नियमांचे पालन करीत याेग्य वेळी निदान, उपचार अाणि खबरदारी घेतल्यास बहुतांश रुग्ण निश्चितपणे घरच्या घरी काेराेनामुक्त हाेऊ शकतात. हीच त्रिसूत्री अंगीकारत मी प्रत्येकाला सांगताे की, एचअारसीटीचा स्काेअर १२ च्या पुढे अाल्यास घाबरून रुग्णालयांच्या दाराेदार बेडसाठी फिरू नये. त्यातूनच संसर्ग वाढून अापण स्प्रेडर बनताे. अाॅक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्यास इतरांनी बेड शाेधावा, ताेपर्यंत डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच अाॅक्सिजन लावावे. रुग्णाच्या मनात भीती निर्माण हाेऊन ताे जास्त गंभीर हाेऊन अचानक मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढत अाहे. डाॅक्टरांनीही रुग्णांना वाऱ्यावर न साेडता त्यांना हे उपचार सांगावेत. - डाॅ. अतुल वडगावकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.