आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी या उपक्रमातून प्राप्त माहितीद्वारे अनेक बाबी पुढे येत आहे. विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘मानस’ अॅप उपयुक्त असल्याचे आराेग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.
‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रमाचे ऑनलाइन आयोजन केले होते. या कार्यक्रमात कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मानस म्हणजे मेंटल हेल्थ आणि नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टिम असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ. धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर व संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
अॅपमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘मानस’ अॅपचे कार्य प्रभावी आहे. विद्यार्थ्यांनी निरोगी, आनंदी आणि स्वस्थ राहण्यासाठी मानसची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्याची समस्या लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामध्ये करण्यात आलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.