आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी ‘मानस’ ॲप:‘कुलगुरू का कट्टा’ द्वारे होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेदमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निदान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी या उपक्रमातून प्राप्त माहितीद्वारे अनेक बाबी पुढे येत आहे. विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘मानस’ अॅप उपयुक्त असल्याचे आराेग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

‘कुलगुरू का कट्टा’उपक्रमाचे ऑनलाइन आयोजन केले होते. या कार्यक्रमात कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मानस म्हणजे मेंटल हेल्थ आणि नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टिम असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ. धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर व संबंधित महाविद्यलयातील विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...