आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीत सुधारणा:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर डिझेल तुटवडा घटला, बहुतांश पेट्रोल डीलरला मिळू लागले इंधन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना मागील पंधरा दिवस डिझेल आठवड्याला सामोरे जावे लागले. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते की काय अशी स्थिती अनुभवल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली होती. यानंतर मात्र इंधनाचा पुरवठा जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सुरळीत झाला आहे.

नाशिक शहरात आणि ऐशी पेट्रोल पंप असून जिल्ह्यात हीच संख्या साडे चारशेच्या आसपास आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशन भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या प्रमुख तीन कंपन्यांकडून जिल्ह्यातील वितरकांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र अचानक कंपन्यांनी वितरणाची पद्धत बदलत आगाऊ पैसे भरा मग इंधन देऊ अशी अट लागू केली. यामुळे अनेक पंप बंद ठेवावे लागले तर पैसे भरणार यांनादेखील पुरेसा डिझेल कंपन्यांनी पुरवठा केला नाही. यामुळे पहिल्यांदाच अभूतपूर्व डिझेल टंचाईचा सामना जिल्हावासियांना करावा लागला पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा दिसू लागल्या होत्या.

परिस्थितीत मोठी सुधारणा

पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या तातडीच्या बैठकीनंतर तेल कंपन्यांनी पुरवठा बर्‍यापैकी सुरळीत केला. भारत पेट्रोलियम च्या बाबतीत सर्वाधिक कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या तक्रारी होत्या, मात्र या कंपनीने रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील पानेवाडी येथील डेपो सुरू ठेवून इंधनाचा मुबलक पुरवठा केल्याने, डिझेल टंचाई इथून बाहेर पडण्यात बऱ्यापैकी यश आले आहे.

तक्रारी घटल्या, इंधन पुरवठा सुधरला

चारच दिवसांपूर्वी पेट्रोलच्या इंधन पुरवठा होत नसल्याच्या मोठ्या तक्रारी होत्या. मात्र या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कमी झाले असून कंपन्यांनी इंधन पुरवठा वाढल्याने परिस्थिती पुन्हा सुरळीत होत आहे, नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...