आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील पहिली टायरबेस जोडबस अर्थातच निओ मेट्रोची भेट नाशिकला मिळाली असून केंद्र शासनाने २१०० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. मात्र या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच अडचणी वाढल्या आहेत. आता मेट्रोच्या चेहडी येथील डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी २.२ किमीचा वाढीव एलिव्हेटेड कॉरिडोर उभारण्यासाठी नव्याने १५० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. केंद्र शासनाकडून २१०० कोटी रुपयांवर एक रुपयाही निधी मिळणे शक्य नसल्याने ही वाढीव तरतूद करण्यापेक्षा सिन्नरफाटा येथील सिटीलिंकच्या बसडेपोसाठी आरक्षित जागा आम्हाला द्या व त्याबदल्यात आमच्या चेहडी येथील जागेत सिटीलिंक बसडेपोहलवा असा नवीन प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र या जागेत यापूर्वीच सिटीलिंक वर्कशॉपचे काम पूर्ण झाले असल्यामुळे जागा कुठून द्यायची असा प्रश्न पालिकेसमोर आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची घाेषणा; अद्याप काम सुरू नाही तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी नाशिकमध्ये २०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी निओ मेट्रोची घोषणा केली होती. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० कि.मी. लांबीचा असून त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतीनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी १० स्थानके असणार आहेत. तर दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिकरोड असा २२ कि.मी. लांबीचा आहे. त्यात गंगापूर गाव , शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिकरोड अशी स्थानके असतील या प्रकल्पासाठी सन २०२३ पर्यंत मुदत आहे.
असा आहे मेट्रो निओ प्रकल्प!
देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो सेवा.
२५ मीटर लांबीच्या २५० प्रवासी क्षमतेच्या जोड बस.
ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर
दोन एलिव्हेटेड कॉरिडोर व दोन फिडर कॉरिडोर उभारणार
एकूण ३१.४० किलोमीटर लांबीचे एलिव्हेटर
गंगापूर ते रेल्वे स्थानक २२ किलोमीटरचा पहिला कॉरिडोर.
पहिल्या कॉरिडोरवर १९ स्टेशन.
गंगापूर ते मुंबई नाका १० किलोमीटरचा दुसरा कॉरिडोर.
द्वारका क्रॉसिंगवर उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल
मनपाला १० टक्के आर्थिक भार उचलावा लागणार
पालिका संकटात; करायचे तरी काय?
मेट्रो, नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे आणि सिटीलिंक असा त्रिवेणी संगम असलेल्या मल्टिमाेडल हबसाठी यापूर्वीच सर्व प्रक्रिया झाल्यामुळे मेट्रोच्या डेपोला जागा कशी देणार असा पेच आहे. जागा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ती उपलब्ध करून न दिल्यास १५० कोटींचा वाढीव भुर्दंड येण्याची भीती आहे.
सर्वसमावेशक तोडगा काढू; मेट्रो - पालिकेची चर्चा सुरू
निओ मेट्रोच्या डेपोसाठी पूर्वी चेहडी येथील जागा दिली असून, या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी अडीच किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडोर उभारावा लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च वाचवण्यासाठी मेट्रोने सिटीलिंक बस वर्कशॉपजवळील जागा मागितली आहे. याठिकाणी यापूर्वीच काम सुरू असल्यामुळे येथील पार्किंगची जागा देण्याची पालिकेची तयारी आहे. मेट्रो व सिटीलिंक तसेच पालिकेच्या संयुक्त चर्चेत सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल.
- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.